Solapur News | सीना बोगद्यातून ९५० क्युसेक पाणी सोडणार; मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

पालकमंत्री जयकुमार गोरे, अजिंक्यराणा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Seena Tunnel Water Release
Seena Tunnel Water ReleaseAI Photo
Published on
Updated on

Seena Tunnel Water Release

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीना बोगद्यातून ९५० क्यूसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामातील पिकांना आवश्यक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माहितीनुसार, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर आलेले पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे भाजपचे मोहोळ तालुका युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी सीना बोगद्यातून पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्यानंतर ९५० क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Seena Tunnel Water Release
Solapur Accident | पुणे–पंढरपूर मार्गावर रस्ता दुभाजक ओलांडणे जीवावर बेतले; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सीना बोगद्यातून पाणी उपलब्ध झाल्याने मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा आधार मिळणार आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने पिकांचे नुकसान टळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

या निर्णयानंतर तालुक्यातील शेतकरी वर्गातून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देत केलेल्या या निर्णयामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news