

सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्मिती व वितरणात सोलापूर जिल्ह्याने राज्याच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. जिल्ह्यातील साडेनऊ लाख नागरिकांना या कार्डचे सुरक्षा कवच मिळाले आहे.
एक नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एक लाख ४४ हजार ४५ आयुष्मान कार्डांची निर्मिती झाली. या कामगिरीसह जिल्हा राज्यात १२ व्या स्थानावर होता. मात्र, त्यानंतर प्रशासनाने राबवलेली विशेष मोहीम राबवली. एक एप्रिल २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ या अवघ्या सहा महिन्यातच जिल्ह्यात तब्बल दोन लाख ४१ हजार १५६ नव्या कार्डांचे वितरण करण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत या कालावधीत कामगिरीत ७४ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली.
आकडे बोलतात
- एप्रिल २०२६ पूर्वी सात लाख ११ हजार ८१ कार्डांचे वितरण
- १ एप्रिल ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान दोन लाख ४१ हजार १५६ कार्ड निर्मिती
- आजअखेर जिल्ह्यात नऊ लाख ५२ हजार २३७ कार्डांचे वितरण पूर्ण