Solapur News: गणवेशाची होणार तपासणी

शासनाचे आदेश : शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख करणार तपासणी
School uniform
School uniform pudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेतील विद्यार्थ्यांच्‍या गणवेशाची तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शाळेच्‍या पहिल्‍याच दिवशी गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. ते गणवेश हलक्‍या प्रतिचे असल्‍याच्‍या तक्रारी शासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यामुळे गणवेशाची तपासणी करण्याचे आदेश शासनाने दिले असून, सोलापूर जिल्‍ह्यातील विविध शाळेतील गणवेशाची तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, प्रत्‍येक तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख करणार आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी गणवेश मिळावे, यासाठी शासनाकडून गणवेशासाठी प्रति विद्यार्थी 280 रुपयेप्रमाणे निधी देण्यात आला आहे. मात्र, गणवेश देताना 240 रुपयांचा दिल्‍याच्‍या तक्रारी शासनाकडे प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना दिलेल्‍या गणवेशाची तपासणी करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्‍यानुसार सोलापूर जिल्‍ह्यातील विविध शाळेत वाटप करण्यात आलेल्‍या गणवेशाची आता तपासणी होणार आहे.

तपासणीनंतर गणवेशाचा दर्जा कसा आहे, याविषयी शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्‍याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news