सोलापूर : दुकान गाळा व प्लॉट देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक

विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल
Solapur property fraud case
प्लॉट देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक करण्यात आली.File Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या 'गॅलेक्सी पनाश'मधील दुकान गाळा व २ प्लॉट देतो म्हणून एकाची १ कोटी २५ लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे (रा.दोघे पुणे) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Solapur property fraud case
हिंगोली : वसुली कर्मचाऱ्यांकडून २८९ महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी, पुण्यातील थेपडे दापत्यांनी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून येथे मजरेवाडी येथील जमिनीवर 'गॅलेक्सी पनाश' नावाने रहिवासी प्लॉट, व्यापारी दुकान गाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक २१ करिता शैलेंद्र किसन गायकवाड (रा.पिंपळे निलख,पुणे) या व्यवसायाकांनी थेपडे दापत्यांना ४५ लाख रुपये दिले. त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादीकडून १५ लाख रक्कम घेतली. दुकान गाळा व दोन प्लॅटच्या नावाने थेपडे दापत्यांनी वारंवार फिर्यादीकडून १ कोटी २५ लाखाची रक्कम उकळली.

त्यानंतर त्यांनी सर्व रक्कम रक्कम व्याजदरानुसार देतो, असे सांगून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून दिले. तसेच एका सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला. तो चेक वाटला नाही. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पती-पत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत.

Solapur property fraud case
हिंगोली : सीएनजी पंप देण्याचे आमिष दाखवून २५ लाखाची फसवणूक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news