Solapur Murder Case : तिप्पेहाळी येथे गोळ्या झाडून तरुणाचा खून

दोघे संशयित ताब्यात; सोमवारी मध्यरात्रीची घटना
Murder Case
Murder Case
Published on: 
Updated on: 

सांगोला : तिप्पेहाळी (ता. सांगोला) परिसरात सोमवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तूलमधून गोळ्या झाडून तरुणाचा खून करण्यात आला. प्रतापसिंह ऊर्फ गब्बर ज्ञानू करचे (वय ३२, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी मृत प्रतापसिंह ऊर्फ गब्बर याची पत्नी अर्चना करचे हिने सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. बालाजी ऊर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे आणि विकी शिवाजी घेरडे (दोघेही रा. किडेबिसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे सोमवारी रात्री सांगोला येथून किडेबिसरीच्या दिशेने चारचाकी वाहनातून जात होता. मध्यरात्री सुमारे १.४६ ते १.५८ या वेळेत तिप्पेहाळी येथील कॅनॉलजवळ संशयित बालाजी ऊर्फ हर्षवर्धन आणि विकी यांनी पाठीमागून प्रतापसिंह याच्या डोक्याच्या उजव्या बाजूस पिस्तूलमधूून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळाला सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी भेट दिली.

जमिनीच्या वादातून खून

पवनचक्कीसाठी जमिनी घेतल्या होत्या. कंपनी प्रकल्प उभा करून राहिलेल्या जमिनी घेत होती. मात्र, पवनचक्क्यांचा वकील हा व्यवहार बघत होता. अशा जमिनी खरेदी घेण्यासाठी संशयितांनी गब्बर यास २० लाख रुपये दिले होते. हे पैसे मागताच गब्बरने पिस्तूल दाखविले होते. तो काटा काढेल या भीतीने दोघा संशयितांनी पिस्तूलने गोळीबार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news