Solapur Police: 4.28 कोटींचा गांजा व अफू ग्रामीण पोलिसांकडून नष्ट

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला तब्बल 4 कोटी 28 लाख 27 हजार 635 रुपये किंमतीचा गांजा व अफूचा मुद्देमाल नष्ट केला
Solapur Police: 4.28 कोटींचा गांजा व अफू ग्रामीण पोलिसांकडून नष्ट
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला तब्बल 4 कोटी 28 लाख 27 हजार 635 रुपये किंमतीचा गांजा व अफूचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत 1697 किलो 429 ग्रॅम गांजा तसेच 19 किलो 618 ग्रॅम अफूचा समावेश होता.

सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मागील काही वर्षांत दाखल झालेल्या अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. 15 मे 2025 रोजी समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलिस उपअधीक्षक शिरीष हुंबे, व. पोलिस निरीक्षक संजय जगताप, वजन मापन निरीक्षक सुधीर खांडेकर, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अभिजित लोहिया, तसेच पुणे येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर तालुका, मोहोळ, मंद्रूप, वळसंग, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी शहर, वैराग, कुर्डूवाडी, करमाळा, पंढरपूर शहर व तालुका, करकंब, मंगळवेढा आणि अकलूज आदी पोलिस ठाण्यांतील एकूण 29 गुन्ह्यांमधील मुद्देमालाची तपासणी करण्यात आली. शासकीय पंचांच्या उपस्थितीत पुन्हा वजन करून नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली. तपासणीत सदर मुद्देमाल गांजा व अफू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याची अंतिम निर्गती करण्यात आली. हा सर्व मुद्देमाल सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोमधील एस.एस. सर्व्हिसेसच्या इन्सिनरेटरमध्ये समितीच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news