

मोहोळ शहर : ‘घरी सोडतो’ असे सांगून एका विवाहितेला कारने तांबोळे रस्त्याकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सोमनाथ विठ्ठल वाघमोडे (रा कोळेगाव ) याच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात अत्याचार, धमकी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी सोमनाथ वाघमोडे याने पीडितेला विश्वासात घेऊन काळ्या रंगाची चारचाकी गाडीत बसविले. गाडीतून तांबोळे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धाडसाने मोहोळ पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.