

सोलापूर : पुणे विभागातील दौंड-मनमाड या दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असून या अंतर्गत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर - परभणी - लातूर रोड - कुर्डूवाडी - सोलापूर या मार्गाने गाड्या वळवलेल्या आहेत.
दौंड-मनमाड या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. गाड्यांचे बदललेले मार्ग खालीलप्रमाणे : गाडी क्रमांक 17323 एसएसएस हुबळी - बनारस एक्स्प्रेस ही गाडी नेहमीच्या मार्गाऐवजी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - छत्रपती संभाजीनगर - मनमाड या मार्गाने धावेल. गाडी क्रमांक 12627 केएसआर बेंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - मनमाड मार्गे वळवली आहे.
गाडी क्रमांक 20657 एसएसए हजरत निजामोद्दीन एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे धावेल. गाडी क्रमांक 20658 हजरत निजामुद्दीन - एसएसएस हुबळी एक्स्प्रेस ही गाडी परतीच्या प्रवासात मनमाड - छत्रपती संभाजीनगर - लातूर रोड - कुर्डूवाडी - सोलापूर या बदललेल्या मार्गाने धावेल.