Solapur crime news: दरोडा, घरफोडीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
Solapur crime news
Solapur crime newsPudhari
Published on
Updated on

सोलापूर : दोन दरोड्यासह सहा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. घुल्या उर्फ गुलाब उर्फ प्रितिज्ञान झिगझिंग पवार (रा. कलकर्जाळ ता. अक्कलकोट) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत सराईत गुन्हेगार, फरार आरोपी यांची शोध मोहिम राबविण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने साहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर व त्यांचे पथक अक्कलकोट उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पेट्रोलिंग करीत असतना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत आरोपी घुल्या उर्फ गुलाब उर्फ प्रितिज्ञान झिगझिंग पवार हा कोन्हाळी ते अक्कलकोट जाणाऱ्या पुलाखाली उभा आहे. त्या अनुषंगाने बाबर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणाहून त्याला शिताफतीने अटक केली. यावेळी त्याने कंबरेला धारधार शस्त्र लावले होते. घुल्या पवार हा सोलापूर जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून तो आठ गुन्ह्यात फरार होता.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अमित बाबर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, रवी माने, बाळराजे घाडगे, राहुल दोरकर, हरिष थोरात, मनोज राठोड, सुनंदा झळके, सुनिल पवार यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news