

सोलापूर : सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे, पुण्याचे अनिल कानस्कर यांच्या संयुक्त संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जन्मतः दोन्ही डोळे नसलेल्या दुर्मिळ तस्कर सापाची संशोधनात्मक नोंद अमेरिकेतील रेपटाईल्स अँड अँफीबियन्स या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये दि. 20 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील पाषाण परिसरात 19 डिसेंबर 2024 रोजी एका रेस्क्यू कॉलदरम्यान हा 20 सेंमी लांबीचा साप आढळला होता. या सापाच्या डोळ्यांच्या जागी बाहुलीऐवजी पूर्णतः गुळगुळीत खवले होते. शारीरिक विकृती असूनही हा साप निरोगी असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.