

सोलापूर : सोलापूर शहरातील तापमान 40 अंशाखाली येऊनही वातावरणातील धग कायम राहिल्याने उकाडा कायम राहिला. जोरदार पाऊस पडून वातावरणात गारवा कधी निर्माण होईल, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी तापमान 40 अंशाखाली नोंदला गेला.
शुक्रवार, दि. 8 मे रोजी 39.7 अंश तर शनिवार, दि.9 मे रोजीही 39.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदला गेले. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने गरम झळा वाहत होत्या. गरम झळामुळे अनेक नागरिकांना उष्माघातसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
यंदाचा उन्हाळा हा अधिक कडक राहिला आहे. उन्हापासून बचावासाठी शरीराला थंडावा देण्यासाठी शहरातील विविध भागांसह विजयपूर रोड, कंबर तलाव, अक्कलकोट रोड, पुणे रोड या मार्गावर ताक, मठ्ठा विक्रीसाठी स्टॉल थाटले आहेत. शहरातील ज्यूस बारमध्ये ज्यूस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.