Solapur MLC election: विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार पुत्र जीवन जानकर यांचा अपक्ष अर्ज दाखल
 MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : विधान परिषदेसाठी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. राऊत यांच्यासाठी शनिवारी चार अर्ज नेण्यात आले आहेत. येत्या सोमवारी (दि. 1 जून) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर माळशिरस मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आतापर्यंत 54 अर्जांची विक्री झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. 1 जून) ही अंतिम तारीख असून, काँग्रेससह भाजप, शिवसेनेने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजपकडून माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजेंद्र राऊत, माजी आ. राजन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यासाठी दीपक वैद्य यांनी एक, दीपक राऊत यांनी एक, विजय राऊत यांनी 2 असे एकूण चार नामनिर्देशनत्र नेले आहेत. भाजपकडून उमेदवाराची घोषणा ही रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळीच होण्याची शक्यता आहे. राजेंद्र राऊत यांच्यासाठी नामनिर्देशनपत्र नेल्याने त्यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

राजेंद्र राऊत यांचे 2024 विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद निवडणुकीत भाजपला एकहाती विजयी मिळवून दिले आहेत. त्यामुळे राऊत यांचे नाव समोर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news