Solapur Temperature : पावसाळ्यातच सोलापूरकरांना घामाच्या धारा

तापमान ३७.९ अंशांवर
Solapur Temperature
Solapur Temperaturepudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : पावसाळ्याचे दिवस असतानाच सोलापूर शहर व जिल्ह्यात मात्र उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असून, बुधवारी कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअस नोंदविले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सोलापूरकरांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.

सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत असून, दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असून, दुपारी रस्त्यांवरील वर्दळही काहीशी कमी होत आहे. पावसाळ्यात साधारणपणे ढगाळ वातावरण आणि पावसाची अपेक्षा असताना सध्या मात्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने सातत्याने खंड दिल्याने शेतीवरही परिणाम होत आहे. पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने उपलब्ध पाण्यावर शेतीचे नियोजन करण्याची वेळ आली आहे.

उकाड्यामुळे नागरिक त्रस्त

दुपारच्या वेळी वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांचा आधार घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news