Solapur Railway Station : रेल्वेस्थानकावर ज्येष्ठांसाठी पाच सुविधा

व्हीलचेअरपासून स्वतंत्र तिकीट काउंटरच्या सेवांचा समावेश
Solapur Railway Station : रेल्वेस्थानकावर ज्येष्ठांसाठी पाच सुविधा
Published on: 
Updated on: 

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना रेल्वेने प्रवास करतांना यांच्या सोयीसाठी स्थानकावर विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात व्हीलचेअर, बॅटरी कार, यात्री मित्र सेवा, स्वतंत्र तिकीट काउंटर आणि मे आय हेल्प यू बूथ या सुविधांचा समावेश आहे. यामुळे ज्येष्ठांचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकतो.

वाढत्या वयामुळे चालताना येणाऱ्या अडचणींचा प्रवाशांना सामना करावा लागते. व्हीलचेअरसह अन्य मदत मिळू शकते. काही वेळा सहायक किवा पोर्टरच्या मदतीने फलाटापर्यंत प्रवाशांना जावे लागते. यामुळे स्थानकांवर (बग्गी) बॅटरी कारची सुविधा आहे. त्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे सोपे होते.

रेल्वे विभाग आता विविध प्रमुख स्थानकांवर आयआरसीटीसीच्या माध्यमातून यात्री मित्र सेवा देणार आहे. यासाठी ऑनलाइन किवा १३९ या रेल्वे हेल्पलाइनवर चौकशी करता येते. ज्येष्ठ प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी किवा रद्द करण्यासाठी स्वतंत्र काउंटरचीही सुविधाही असणार आहे. स्थानकावरील ‘मे आय हेल्प यू’ बूथवरून फलाट बदलणे, उपलब्ध सुविधा आणि प्रवासासंबंधी मार्गदर्शन मिळू शकते. सर्व सुविधा प्रत्येक स्थानकावर उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित स्थानकावर चौकशी करावी. आवश्यकतेनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.

l चालण्यास अडचण असलेल्या ज्येष्ठांना व्हीलचेअरची मदत मिळू शकते. उपलब्धतेनुसार सहायक किवा पोर्टरची मदत घेता येते.

l मोठ्या स्थानकांवर फलाटापर्यंत जाण्यासाठी बॅटरी कारची सुविधा.

l यात्री मित्र सेवा ही देशातील प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना मदत मिळू शकते. १३९ क्रमांकावर चौकशी करता येते.

l स्वतंत्र तिकीट काउंटरवर ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट काउंटरची सुविधा.

l ‘मे आय हेल्प यू’ बूथ हा फलाट, बॅटरी कार, व्हीलचेअर आणि प्रवासासंबंधी मार्गदर्शनासाठी मदत केंद्राशी संपर्क साधता येतो.

l विविध प्रमुख स्थानकांवर आयआरसीटीसीच्या माध्यमातून सेवा मिळणार.

l ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news