Railway Recruitment : स्टेशन मास्तरच्या १२५० जागांवर होणार भरती

आजपासून प्रक्रिया सुरू; २५ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी
Railway Recruitment
Railway RecruitmentFile Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : रेल्वेमध्ये भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेशन मास्तर या पदाच्या १,२५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया उद्या मंगळवार (दि. २७) पासून सुरू आहे. या भरतीमुळे सुशिक्षित बेकार तरुणांना रेल्वेत रोजगाराची संधी मिळू शकते.

ही भरती प्रक्रिया उद्या मंगळवार ( दि. २७) पासून सुरू होणार असून, इच्छुक तरुणांना पुढच्या महिन्यातील २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५,४०० रुपये मूळ वेतन मिळणार आहे. याशिवाय रेल्वेच्या नियमानुसार अन्य महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि अन्य भत्ते मिळू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे होणार आहे. त्यामुळे तरूणांनी सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, तर्कशक्ती आणि सामान्य विज्ञान या विषयांचा अभ्यास करावा लागेल. मागील प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यासही परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news