Solapur News : आता रेल्वेतील जेवणाचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

निकृष्ट जेवण आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई
Railway Food Audit
Railway Food Audit
Published on: 
Updated on: 

सोलापूर : रेल्वे गाड्या व स्थानकांवरील हॉटेलमधील अन्नाचा निकृष्ट दर्जा व अस्वच्छतेच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आता भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया सोबत करार केला आहे. या करारानुसार देशभरातील रेल्वे खानपान सेवांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे.

या तपासणीसाठी क्यूसीआयकडून स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. हे पथक बेस किचन, फूड स्टॉल आणि धावत्या गाड्यांमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंगची तपासणी करेल. तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल.

मध्य रेल्वेसह सर्व विभागात ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. सध्या आयआरसीटीसीकडून देशभरात दररोज सुमारे ८०० गाड्यांमधून २० लाख प्रवाशांना जेवण पुरवले जाते. पुण्यातील बेस किचनसह पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांचाही या ऑडिटमध्ये समावेश असेल.

अशी असेल रचना

l आयआरसीटीसी, क्यूसीआय मध्ये करार

l बेस किचन, स्टेशन फूड स्टॉल, रेल्वेतील जेवण गुणवत्ता तपासणी

l क्यूसीआयची स्वतंत्र पथके

l निकृष्ट दर्जा आढळल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई

l देशातील ८०० गाड्या, दररोज २० लाख प्रवाशांना लाभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news