

पुढारी ऑनलाईन डेस्क : Solapur Pune Highway Accident | सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडीजवळ कंटेनर, मिनीबस आणि दुचाकीचा तिहेरी भीषण अपघात झाला. मिनी बसने पंढरपूर-तुळजापूरला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांमधील दोघे आणि दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर बसमधील अन्य १५ जण जखमी झाले आहेत.
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन मिनी बसला धडक दिली. ट्रकच्या धडकेने पंढरपूर-तुळजापूर देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मिनी बस पलटी झाली. यामध्ये बस चालकासह तिघेजण ठार झाले, तर पंधरा जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एक जण जागीच ठार झाला आहे. कंटेनर, मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती, क्रेनच्या साह्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.