

सोलापूर : घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा आणि सरकारच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 8) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक करून आंदोलन केले.
संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख व जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक केला आणि त्याच ठिकाणी जेवण करून सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी गॅस नाही, तर चूलच पेटवू, महागाई कमी करा गॅसपुरवठा सुरळीत करा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच, तत्काळ गॅसपुरवठा सुरळीत करावा व दर नियंत्रणात आणावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
हे आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव शेवंता देशमुख, राज्य समिती सदस्य अफसाना बेग, गीता वासम, जलालबी शेख, रसूला शेख, फातिमा मडकी, साहेब शेख, परविन शेख, तबसुम शेख, जमील शेख, अरुणा रासकोंडा, उमा बोगा, लक्ष्मी माचेर्ला, जमुना कळसकर आदींनी परिश्रम घेतले.