Solapur Civil Hospital: सिव्हीलमध्ये गर्भवती महिलेची अवहेलना

कर्मचाऱ्यांकडून रुग्णांबरोबर उध्दट वर्तन केल्याने कारवाईची मागणी
Solapur Civil Hospital
Solapur Civil Hospital
Published on
Updated on

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारापेक्षा कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाचा अनुभव रुग्णांना नेहमी येतो. यास अनुसरून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली. येथील एका कर्मचाऱ्याने गर्भवती महिलेच्या पतीशी हुज्जत घातली. केस पेपर देत नाही, काय करायचे ते करा, अशी अरेरावी केली. असा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. दरम्यान, या हुज्जतीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याविषयी तीव्र शब्दात समाजमाध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

गर्भवती महिला ही उपचारासाठी पतीसोबत शासकीय रुग्णालयात आली होती. केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभी असताना. रूग्णालयातील कर्मचाऱ्याने किरकोळ कारणावरून गर्भवतीच्या पतीशी वाद घातला. इतकेच नाही. तर गर्भवती रुग्णासह तिच्या पतीच्या विनंतीला केराची टोपली दाखवली. कर्मचाऱ्याने थेट खिडकीच बंद असल्याचे फलक खिडकी समोर लावले व तेथून निघून गेला. यामुळे खुप वेळ रांगेत उभे असलेल्या त्या गर्भवती महिलेचा पती व अन्य आजारी रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. असा प्रकार नेहमीच होत असल्याच्या घटना या रूग्णालयात घडतच असतात. अशी घटना घडूच नये. यासाठी रूग्णालयाच्या प्रशासनस्तरावरून कडक निर्णय घेत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

ही घटना अयोग्य असून याची गंभीर दखल रूग्णालय प्रशासनाने घेतली आहे. संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधत चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. रुग्णालयासारख्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ही बेजबाबदार व असंवेदनशील वागणूकीने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.
- डॉ. संपत तोडकर, वैद्यकीय अधीक्षक शासकीय रुग्णालय, सोलापूर
शासकीय रुग्णालयात गरीब रूग्ण येतात. हौसेने येथे कोणीही येत नाहीत. येथे सुविधा आहेत. पण, कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे रूग्णालयाची प्रतिमा मलिन होत आहे. अशा कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी.
- प्रमोद भुरके, रूग्णाचा पती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news