Solapur news : परदेशातील २३६ विद्यार्थ्यांना पाठवले गेले विविध साहित्यांचे डाकपार्सल

परदेशस्थ नातेवाईकांसह जवळच्या मित्रांसाठी खास भारतीय अस्सल पदार्थांचा पार्सलमध्ये समावेश
Solapur news : परदेशातील २३६ विद्यार्थ्यांना पाठवले गेले विविध साहित्यांचे डाकपार्सल
Published on
Updated on

सोलापूर : परदेशात वैद्यकीय अभियांत्रिकी व अन्य अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी शहर जिल्ह्यातून गेलेल्या २३६ विद्यार्थ्यांना येथील पालकांनी दिवाळीच्या फराळासह तिखट, लोणचे यासह दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या अन्य विविध प्रकारचे पीठासह अन्य खाद्यपदार्थ परदेशात पाठवले. तसेच ७११ जणांनी नातेवाईकांसह आप्तेष्ठ मित्रांना परदेशातील खुशाली विचारण्यासाठी पत्रेही पाठवलेत. फराळ व टपालातून पोस्ट विभागाला चौदा लाख ७० हजारांचा महसूल मिळाला आहे. पोस्टातून हे साहित्य पाठविला येते. या सुविधेचा लाभ अनेकांनी घेतला.

शहर व जिल्ह्यातील अनेक जण परदेशात नोकरी व शिक्षणासाठी गेलेले आहेत. येथे वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी हे परदेशात जातात, तसेच अभियांत्रिकीचे शिक्षणासाठी काही विद्यार्थी हे परदेशात जाणे पसंत करतात.

या विद्यार्थ्यांचे २३६ पालक हे दिवाळीच्या फराळासह चटणी, पीठ, लोणचे यासह अन्य खाद्यपदार्थ पाठवलेले आहेत. याशिवाय, येथील ७११ जणांनी आपले नातेवाईक व आप्तेष्ठ मित्रांना पत्राद्वारे खुशाली विचारलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना परदेशातील जेवण आणि तेथील खाद्य संस्कृती ही आवडत नाही, अशावेळी ते हातांनी जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असतात. स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारे अनेक पदार्थ ते घेऊनही जातात. नंतर त्यांचे पालकही स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य हे पोष्टाद्वारे पाठवतात. यातून परदेशातील वास्तव सुखकर होण्यास बळ मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news