Solapur Politics : महसूलमंत्री बावनकुळेंच्या राजकीय भेटीगाठी चर्चेत

आ. कोठे यांच्या बंधूचे कौतुक, काळेंच्या घरी सदिच्छा भेट
 Chandrashekhar Bawankule
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (File photo)
Published on
Updated on

सोलापूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारपासून दोन दिवसीय सोलापूरच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भाजप नेत्यांच्या घरी भेटीगाठी घेत राजकीय पेरणी केल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी रात्री ते सोलापुरात मुक्कामी होते.

सोमवार, दि. 11 मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी आ. सुभाष देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर दोघांत बंद दाराआड चर्चा झाली. पुन्हा सोमवारी महसूलमंत्री बावनकुळे यांनीही आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी अचानक भेट दिल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या या भेटीत सोलापुरातील विविध विषयांवर चर्चा झाली.

सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी थेट आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते तसेच भाजप युवानेते रोहन देशमुख, बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख उपस्थित होते.

रोहन देशमुख यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. यानंतर बावनकुळे आणि आमदार देशमुख यांच्यात शहरातील प्रलंबित प्रश्न, महसूल खात्याशी संबंधित विषय तसेच आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news