Rohit Pawar Protest : आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमधील 'अन्नत्याग आंदोलन' स्थगित

कर्जमाफीच्या मुद्द्यावर २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Rohit Pawar Protest
आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमधील 'अन्नत्याग आंदोलन' स्थगित
Published on
Updated on

पंढरपूर : गेल्या तीन दिवसांपासून सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे 'अन्नत्याग आंदोलन' मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात आल्याने स्थगित करण्यात आले आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री उशिरा ११.३० वाजता पंढरपूर येथे आंदोलनस्थळी भेट देत आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. आमदार रोहित पवार यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर २२ जून पर्यंत बैठक लावण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी पवार यांनी दिले. त्यानंतर रोहित पवार यांनी 'अन्नत्याग आंदोलन' तूर्तास मागे घेतले.

दरम्यान आ रोहित पवार म्हणाले की, शेतकरी यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. त्यासाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या नगरीत आंदोलन सुरू केले. सरकार बैठकीत नक्की मागण्या मान्य करेल, अशा विश्वास व्यक्त करत अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू, पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली तर करू, अशा विश्वास उपस्थितांना दिला आहे. यावेळी आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक आदीसह आंदोलक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार रोहित पवार यांनी उपोषण कर्त्यांबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर नामदेव पायरी येथे जाऊन नामदेव पायरीचे दर्शन घेत मातेकडून पेढा भरवत आंदोलन स्थगित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news