Solapur Politics: समर्थकांना उमेदवारी नाकारल्याने आ. सुभाष देशमुख संतप्त

आ. कल्याणशेट्टी, मानेंच्या कुरघोड्यांनी त्रस्त झाल्याने मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हणाले, माझा राजीनामाच घ्या
Solapur Politics: समर्थकांना उमेदवारी नाकारल्याने आ. सुभाष देशमुख संतप्त
Published on
Updated on
अमोल साळुंके

सोलापूर : दक्षिण सोलापूर या आपल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या समर्थकांना डावलून अन्य ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या तसेच अन्य पक्षातून भाजपमध्ये नव्यानेच आलेल्यांच्या समर्थकांना गट, गणात उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त आ. सुभाष देशमुखांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सर्व प्रकार कानावर घातला. हे असे होणार असेल तर माझा राजीनामाच घ्या, असा पवित्रा घेतला.

दरम्यान, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण मतदारसंघातील प्रभावी नेते दिलीप माने यांच्या समर्थकांना आ. देशमुखांच्या मतदारसंघात देण्यात आलेल्या गट, गणांची उमेदवारी रद्द करण्यात आली. एकूणच या प्रकारामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस उघड झाली. महापालिका निवडणुकीत आ. विजयकुमार देशमुख यांना तर आता गट गणांच्या निवडणुकीत आ. सुभाष देशमुखांना धक्के देण्यास पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. कल्याणशेट्टी यांनी सुरुवात केल्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार रंगली.

एकूणच या प्रकारातील गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी आ. देशमुख यांची समजूत काढून तुमच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तुमच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असे आ. देशमुखांना आश्वस्त केले व तशी कृतीही त्वरेने केली. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावान तसेच आ. देशमुखांच्या कार्यकर्त्यांना गट, गणांत संधी मिळाल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news