Ashadhi Wari : वारी आरोग्यदायी, सुरक्षित ठरावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दोन एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा
Eknath Shinde
Eknath ShindePudhari News Network
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल, अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ही वारी सुरक्षित आणि निर्मळ ठरेल यासाठी सांघिक कामाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित आषाढी वारी अनुषंगाने आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आ. तानाजी सावंत, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, आ. उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सीईओ कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिता भालके, राजेंद्र शेळके, प्रांत सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केल्यावर सांगितले, की येथे आणखी स्वच्छता नियमितपणे होणे आवश्यक आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधामुळे, स्वच्छतेमुळे समाधानी झाला पाहिजे. या दृष्टीने यंत्रणेने काम करावे. वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एअर ॲब्म्युलन्सची सुविधा निर्माण केली आहे, वीज वितरण कंपनीने आजपासून लोडशेडिंग बंद करावे. वारी होईपर्यंत नियमित वीजपुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. वारकरी हाच व्हीआयपी असून त्यांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल, अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ही वारी सुरक्षित आणि निर्मळ ठरेल यासाठी सांघिक कामाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित आषाढी वारी अनुषंगाने आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आ. तानाजी सावंत, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, आ. उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सीईओ कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिता भालके, राजेंद्र शेळके, प्रांत सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केल्यावर सांगितले, की येथे आणखी स्वच्छता नियमितपणे होणे आवश्यक आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधामुळे, स्वच्छतेमुळे समाधानी झाला पाहिजे. या दृष्टीने यंत्रणेने काम करावे. वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एअर ॲब्म्युलन्सची सुविधा निर्माण केली आहे, वीज वितरण कंपनीने आजपासून लोडशेडिंग बंद करावे. वारी होईपर्यंत नियमित वीजपुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. वारकरी हाच व्हीआयपी असून त्यांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

नगरविकास विभागाकडून निधी कमी पडणार नाही

वारकऱ्यांसाठी आणखी सुविधा आवश्यक असल्यास नगर विकास विभाग, आरोग्य विभाग, राज्य परिवहन विभागाच्या वतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही. पंढरपूर नगरपरिषदेला मलनिसारण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक व दर्शन मंडप तसेच शहरातील अन्य कामांसाठी एकूण ६७१ कोटींचा निधी मंजूर केल्याचेे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नदी परिसराच्या स्वच्छतेसाठी पाच कोटींचा निधी

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी निधीची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला. या निधीमुळे नदी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांना अधिक स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news