Solapur Bike Theft : पोलिसांनी १२ तासात लावला दुचाकी चोरट्यांचा छडा

दोन आरोपी जेरबंद
Bike Theft
Bike TheftPudhari file photo
Published on: 
Updated on: 

बार्शी : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत बार्शी तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली. प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

सर्फराज मुसा शेख (वय ३९) आणि ऐजाज इस्माईल बागवान (वय २८) (दोघे रा. नाळे प्लॉट, बार्शी) यांना जेरबंद करण्यात आले आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे फिर्यादी नितीन माळी यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि अक्षय सोनवणे यांनी तपासाला गती दिली.

पथकाने अवघ्या १२ तासांत यश मिळवले. या कारवाईत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोउनि कुलदीप सोनटक्के, आबासाहेब शिरगिरे, राजकुमार यावलकर आणि अंमलदार संदीप निचळ, गणेश दळवी, बाबासाहेब हांडे, महमद महेदी, आकाश कांबळे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news