

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने एकजण जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
गणेश मारुती गाडेकर (वय 24, रा. बोरामणी) असे त्याचे नाव आहे. गणेश हा बोरामणी एस.टी. स्टँडकडे दुचाकीवरून जात असताना पिकअप (एमएच 13 बी क्यू 8768) ने धडक दिली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला. उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.