Pandharpur Vitthal Temple| कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात ‘एफडीए’कडून तपासणी

विश्लेषणासाठी १२ आस्थापनांच्या खाद्यपदार्थांचे १८ नमुने घेतले
Pandharpur Vitthal Temple
Pandharpur Vitthal Temple
Published on: 
Updated on: 

सोलापूर : कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून पंढरपुरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी व प्रसाद विक्री केंद्रांसह एकूण १२ आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. विविध खाद्यपदार्थांचे १८ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची साठवणूक, परिसरातील स्वच्छता, खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत, वापरण्यात येणारे खाद्यतेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या मोहिमेवेळी घेण्यात आलेल्या १८ नमुन्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

येथे नोंदवा तक्रार

वारीच्या कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन FDA तक्रार पोर्टलवरही तक्रार नोंदविता येणार आहे.

वारी कालावधीत सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे निकष काटेकोरपणे पाळावेत. भाविकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही हयगय करू नये.
- साहेबराव देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.