Solapur News| शहर व जिल्ह्यात १८ लाख ४७ हजार मधुमेही

रुग्णांच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक १०० रुग्णांमागे १३ मधुमेही
Diabetes
Diabetes
Published on: 
Updated on: 

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्य विभागाकडून राबवलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत मधुमेहीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील १०० नागरिकांमागे १३ जण मधुमेहाने बाधित असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

३० वर्षांवरील २१ लाख ३४ हजार नागरिकांच्या उद्दिष्टापैकी तब्बल १८ लाख ४७ हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत १ लाख ३६ हजार १०२ नागरिक मधुमेह ग्रस्त असल्याचे निदान झाले आहे. ​तसेच आजाराचे वेळेत निदान होऊन तातडीने उपचार सुरू करता यावेत, या मुख्य उद्देशाने ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.