

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. २) कांद्याची १५७ ट्रक आवक झाली. एक नंबरच्या प्रति क्विंटल कांद्याला सहा हजार रुपयांचा दर मिळाला. आवक वाढूनही पाचशे रुपयांची दरवाढ झाली. येत्या काही दिवसांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बाजार समितीत पंधरा हजार ७०२ क्किंटल कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला सहा हजार तर सरासरी दर तीन हजार ३०० रुपये दर मिळाला. सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील काही भागांतून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
दरवाढीचे संकेत पावसाअभावी जिल्ह्यात
चालू हंगामात कांद्याचे क्षेत्र घटले आहे. त्यातच चाळीमधील कांदा संपल्याने कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याला चांगला दर मिळत असून, आणखीही दर वाढण्याचे संकेत आहेत.
कांद्यास मिळालेला दर
सर्वाधिक : ६०००
सरासरी : ३३००
कमी : ५००