Solapur Onion Price: सोलापुरात कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार दर

सुमारे २८ हजारांहून अधिक पिशव्यांची आवक; भाव आणखी वाढण्याची शक्‍यता
Onion Price
Onion Price Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास ५ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. बुधवारी (दि. १९) २८ हजार २२८ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली.

बुधवारी कमाल साडेपाच हजार, तर सर्वसाधारण दोन हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्यास मिळाला. कांद्याच्या कमी आवकेमुळे कांद्याला चांगला दर मिळत आहे. दरम्‍यान, एक नंबर कांद्याला पाच हजारांपेक्षा जास्‍त दर मिळत आहे, तर सरासरी दर तीन हजारांच्‍या आसपास आहे. मात्र, काही मालासच साडेपाच हजार भाव मिळत असल्‍याने उत्पादकांत नाराजी आहे.

उलाढाल तब्बल चार कोटींची

सोलापूर बाजार समितीत १४६ ट्रक कांद्याची आवक झाली. त्याच्या लिलावातून ४ कोटी २३ लाख ७४ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्‍याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news