Solapur News: मोडक्‍या चाळींच्‍या होणार टोलेजंग इमारती

बी-२ सत्ताप्रकार होणार कमी; आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रयत्‍न यशस्‍वी
Solapur News: मोडक्‍या चाळींच्‍या होणार टोलेजंग इमारती
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील वर्ग दोन (बी-२) सत्ता प्रकरातील मिळकती आता मिळकतदारांच्‍या नावावर होणार आहेत. याबाबत मंगळवारी मंत्रालयात उच्‍चस्‍तरीय बैठक पार पडली.

रहिवास क्षेत्रासाठी २.५ आणि व्‍यावसायिकांसाठी ५ टक्‍के रक्‍कम भरुन बी २ मिळकती मालकीच्‍या होणार आहेत. या निर्णयामुळे शहरातील कामगारांच्‍या मोडक्‍या चाळींऐवजी टोलेजंग इमारती उभ्या राहणार असून कामगारांना हक्‍काची व चांगली घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. देवेंद्र कोठे यांच्‍या प्रयत्‍नांना यश आले आहे.

बी-२ च्‍या जमिनी, चाळी मिळकतदारांच्‍या नावावर होण्यासाठी आ. देवेंद्र कोठे यांनी प्रयत्‍न सुरु केले आहेत. यासाठी अनेकदा बैठका झाल्या. मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्‍या उपस्‍थितीत महत्‍वाची बैठक पार पडली. यामध्ये या बैठकीत प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बी-२ मिळकतींशी संबंधित कायदेशीर, प्रशासकीय आणि धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करत विविध विभागांमध्ये समन्वय साधून निर्णय प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला.

शहरात बी-२ सत्‍ताप्रकारात खाजगी मालमत्‍तांसह काही गृहनिर्माण सोसायट्या आणि मिलच्‍या चाळींचा समावेश आहे. या तीनही प्रकारातील बी-२ सत्ताप्रकार कमी करुन त्‍याला बी-१ करण्यासाठी शासनास शुल्‍क भरावे लागणार आहे. रहिवास क्षेत्रासाठी रेडीरेकनरच्‍या २.५ टक्‍के तर व्‍यावसायिक क्षेत्रासाठी ५ टक्‍के रक्‍कम भरावी लागणार आहे. काही दिवसात मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या निर्णयावर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news