

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कामती जवळ पिकअपचे टायर फुटून पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (दिनांक 13) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
महावीर वसंत खंदारे ( वय 45 रा. पोखरापूर, ता. मोहोळ) आणि बाई नागनाथ सिंगरे ( वय 50, रा पोखरापूर, ता. मोहोळ) असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही पिकअप मधून कोरवली येथून मोहोळ कडे निघाले होते. कामती पासून दोन किलोमीटर अंतरावर पिकअपचे टायर फुटून ती पलटी झाली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.