Solapur Crime : दोन कोटी सत्तर लाख रुपये हस्तगत; चौघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा व टेंभुर्णी पेालिसांची दमदार कामगिरी
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

टेंभुर्णी : कर्नाटक राज्यातील चडचण (जि. विजयपूर) येथील साडी दुकानदार बाहुबली एन. मुत्तीन यांच्या कपडे खरेदीसाठी निघालेल्या मॅनेजरकडील तीन कोटी रुपये रक्कम लुटलेल्या सर्व चार आरोपींना टेंभुर्णी पोलिसांनी जेरबंद करीत दोन कोटी सत्तर लाख रुपये जप्त केले आहेत.

अजित नामदेव सुर्वे (वय 26, रा. पांढरे वस्ती, मोडनिंब), सिद्धेश्वर नामदेव माने (34, रा. पालखीमार्ग,मोडनिंब), अजित नामदेव सुर्वे (26, रा. पांढरेवस्ती,पालखी मार्ग मोडनिंब), शुभम शहाजी पाटील (23, रा. रानमळा, मोडनिंब) विकी राजाभाऊ गिड्डे (रा. दत्तनगर मोडनिंब, ता. माढा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील फिर्यादी धुंडाप्पा रामान्ना खलाटे (वय 35, रा. गोटयाळ, ता. चडचण, जि. विजयपूर) यांच्याकडे त्यांचे दुकानाचे मालक यांनी त्यांस सुरत येथून कपडे माल आणण्यासाठी रोख रक्कम तीन कोटी रुपये दोन पोत्यात भरुन दिले होते. फिर्यादी खलाटे हे रक्कम घेऊन नागनाथ सुर्वे, सुनील सुर्वे यांच्या सोबत टेंम्पोमधून कॅबिनच्या टपावर पैशाची दोन पोती ताडपत्री ठेवून टेंभुर्णी-करमाळा रोडरून जात होते. ते अकोले-खुर्द हद्दीतील टोलनाक्याचे पुढील बाजूस वळणावरून जात असताना टेम्पोपुढे स्विप्ट कार आडवी लावून चार जणांनी चाकूचा धाक दाखवून केबिनमध्ये ठेवलेली तीन कोटींची रक्कम घेऊन धूम ठोकली होती.

याचा तपास सहा. पो. अधीक्षक तथा टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे प्रभारी राहुल आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडील स्थानिक गुन्हे शाखेची दोन तपास पथके तयार करण्यात आली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने टिमला तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीनुसार चौघांना जेरबंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news