Solapur News : जलसंधारण कामांना गती द्या

जलसंधारणांच्‍या कामांना गती देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे
Solapur News : जलसंधारण कामांना गती द्या
Published on: 
Updated on: 

सोलापूर : जिल्‍ह्यातील पाझर तलाव, गाव तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांची कामे कासगवतीने सुरु आहेत. पावसाअभावी ही बंधारे कोरडेठाक पडली आहेत. त्‍यामुळे जलसंधारणांच्‍या या कामांना गती देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

एकीकडे निसर्गाची अवकृपा असताना, दुसरीकडे संभाव्य जलसंकटाला तोंड देण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली जलसंधारणाची कामे मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

यंदाच्‍या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे. ऑक्‍‍टोबर महिना उजाडला तरी तलावांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही. येत्या काळात शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्‍यामुळे जलसंधारणाची कामे गतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, याकडे जिल्‍हा परिषदेचे जलसंधारण विभाग दुर्लक्ष करत असल्‍याचे चित्र दिसत आहे.

​दुरुस्ती व खोलीकरण रखडले

जिल्‍ह्यातील अनेक पाझर तलाव, गाव तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांची दुरवस्‍था झाली आहे. तसेच काही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. ही कामे अद्यापही सुरु झाली नाहीत, ती तत्‍काळ सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

​बळीराजा चिंतेत

तलाव कोरडे राहिल्याने आगामी रब्बी हंगामातील पिकांचे काय होणार, या विचाराने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तसेच विहिरींची पातळी खालावल्याने ग्रामीण भागात लवकरच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागल्‍याचे चित्र विविध तालुक्‍यातील विविध गावांमध्ये दिसत आहे.

हाती घेण्यात आलेली कामे (सन २०२३ ते २६)

पाझर तलाव : २७२

गाव तलाव : २८

सिमेंट बंधारे : ९०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news