Solapur Airport : सोलापूर-मुंबई विमान आजपासून बंद

दृश्यमानतेची कमतरता की, कंपन्यांवरील दबाव?
Solapur Airport
सोलापूर हवाई अड्डा
Published on
Updated on

सोलापूर : मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली सोलापूरची विमानसेवा आज, मंगळवारपासून (दि. ३०) बंद होत आहे. कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरण्यास अडचण असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्याचा निर्णय स्टार एअरलाईन्स कंपनीने घेतला.

दरम्यान, यापूर्वीच म्हणजे १८ जूनपासून सोलापूर ते गोवा विमानसेवा फ्लाय ९१ कंपनीने बंद केली आहे. त्यानंतर आता मुंबई सेवाही बंद करण्याचा निर्णय स्टार कंपनीचा झाला आहे. असे असले तरी मुंबईची विमानसेवा १६ सप्‍टेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. परंतु, त्याबाबत साशंकता आहे.

ही असू शकतात कारणे

  • सोलापुरात पावसाळ्यात कमी दृश्यमानता असते त्‍यामुळे विमानाच्‍या टेक ऑफ आणि लँडिंगला अडथळा येत असल्याचे कारण देत दोन्‍ही कंपन्यांनी विमानसेवा बंद केली

  • इतर शहरात विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांवर दबाव असल्याने सोलापुरातील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची सोलापुरात चर्चा आहे

  • नाईट लँडिंगसह विमानतळावरील अतिक्रमण काढणे, रनवेची लांबी वाढवणे, भटकी कुत्री, पक्षी यांचा बंदोबस्‍त करणे आदी कारणेही या सेवाबंद मागे असू शकतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news