Pandharpur News| मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार : व्यापाऱ्यांचा इशारा

चार वर्षांपासून केवळ विश्वासात घेण्याचे आश्वासन
Pandharpur News
Pandharpur News
Published on
Updated on

पंढरपूर : चार वर्षांपासून पंढरपूर कॉरिडॉरबाबत आम्हाला विश्वासात घेणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, एकही आमदार, मंत्री भेट देत नसल्याने आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध करणार, असा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी दिला.

पश्चिमद्वार व्यापाऱ्यांनी बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावेळी महाजन म्हणाले, पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा शासनाने नगरसेवकांना सादर केला असून, याविषयी अद्याप संभाव्य बाधितांशी चर्चा केली नाही. योजनेच्या घोषणेनंतर प्रत्येक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधितांना विश्वासात घेतले जाणार असल्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, चार वर्षात हा विश्वास कोठेच दिसला नाही. त्यामुळे कॉरीडॉरबाबत आमच्याशी लोकप्रतिनिधी संपर्क करीत नाहीत. त्यामुळे यापुढे आम्ही कोणाशीही संपर्क साधणार नाही. दशमी दिवशी मुख्यमंत्री पंढरपूर येथे दाखल झाल्यापासून ते शहरातून बाहेर पडेपर्यंत मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवणार आहाेत. दुकानाच्या बाहेर काळे झेंडे लावून त्यांचा निषेध करणार आहोत. यावेळी कौस्तुभ गुंडेवार, नारायण गलगलकर, मंदार इचगावकर, संतोष हिल्लाळ, तुषार खंडागळे, संतोष बडवे, अनंत काळे, जोशी, दुमकुंडवार, गंगाखेडकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news