Solapur news: अपत्य होत नसल्याच्या नैराश्यातून २८ वर्षीय विवाहितेने जीवन संपवले; मोहोळमध्ये दुर्दैवी घटना

हनुमंत आणि पूनम यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, अपत्य होत नसल्याने पूनम या मानसिक तणावात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली
Women ended life
Published on
Updated on

मोहोळ : अपत्य होत नसल्याच्या कारणावरून नैराश्यात असलेल्या २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मोहोळ शहरातील नागनाथ गल्ली परिसरात सोमवारी (दि. १ सप्टेंबर) घडली. पूनम हनुमंत मोहिते असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Women ended life
Solapur Education News: प्रत्‍येक तालुक्‍यात दोन मॉडर्न, तीन आदर्श शाळा होणार

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नागनाथ मोहिते हे पत्नी पूनम यांच्यासह नागनाथ गल्ली येथे राहत होते. ते चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचे आई-वडील व लहान भाऊ शेतातील वस्तीवर राहतात. हनुमंत आणि पूनम यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, अपत्य होत नसल्याने पूनम या मानसिक तणावात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Women ended life
Solapur News: सोलापूरच्या उन्नत मार्गाला निकडीच्या प्रकल्पाचा दर्जा

सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता हनुमंत हे कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी पूनम घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास हनुमंत यांना त्यांच्या मालकांचा फोन आला. त्यांच्या आईने संपर्क साधून पत्नीने गळफास घेतल्याची माहिती दिल्याचे मालकांनी सांगितले. हनुमंत तातडीने घरी पोहोचले असता, पूनम यांनी घरातील पत्र्याखालील लोखंडी पाइपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची माहिती मोहोळ पोलिसांना देण्यात आली.

Women ended life
Solapur News : लग्नाळू तरुण छेडणार आंदोलन

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी हनुमंत मोहिते यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एच. सी. माने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news