Solapur News : विमा रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू

सर्व शस्त्रक्रिया एकाच छताखाली; विमा कार्डधारकांसाठी मोफत उपचार
Solapur News : विमा रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू
Published on: 
Updated on: 

सोलापूर : येथील विमा रुग्णालयात अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कँपस सुरू करण्यात आले आहे. यामुळे किरकोळ व जटिल शस्त्रक्रिया देखील एकाच छताखाली होणार आहेत. शहर जिल्ह्यातील कामगारांसह कुटुंबातील अन्य सदस्य रूग्णांना उच्च दर्जाची सेवा मिळणार आहे.

येथे नोंदीत विमा कार्डधारक कामगार व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवर मोफत उपचार केले जातात. यापूर्वी जटील शस्त्रक्रियेसाठी टाय अपच्या माध्यमातून अन्य रुग्णालयात जावे लागत असे.वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करून लाखो रुपये खर्चून येथील रुग्णांसाठी अत्याधुनिक मॉड्युलर तीन ऑपरेशन थिएटरचे कँपस करण्यात आले आहे. एकाच वेळी अनेक रुग्णांवर तातडीची शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. यातून विविध गरजू रूग्णांना आरोग्यसेवा मिळू शकेल.

येथे नियमित रुग्णसंख्या मोठी आहे. काही वेळा एकापेक्षा अधिक रूग्णांवर ऑपरेशन करावे लागते. अशा वेळी अडचणी येतात. त्या आता या ऑपरेशन थिएटरमुळे येणार नाहीत.
- डॉ. संजय वाळुंजकर, वैद्यकीय अधीक्षक, विमा रुग्णालय
सामान्य कामगारासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर मोफत उपचार केले जातात. नुकतेच तीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर एकाच ठिकाणी केले आहे. भविष्यात अत्यवस्थेतील एकापेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करता येतील.
- डॉ. सीमा क्षीरसागर-पटवे, निवासी वैद्यकीय अधिकारी, विमा रुग्णालय
logo
Pudhari News
pudhari.news