Shaktipeeth Highway | पंढरपूर: अंगावर डिझेल ओतून घेत विजेच्या खांबावर चढून रोखली शक्तिपीठ महामार्गाची मोजणी!

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक
Shaktipeeth Highway : पंढरपूर तालुक्यात अंगावर डिझेल ओतून घेत विजेच्या खांबावर चढून रोखली शक्तिपीठ महामार्गाची मोजणी!
Shaktipeeth Highway : पंढरपूर तालुक्यात अंगावर डिझेल ओतून घेत विजेच्या खांबावर चढून रोखली शक्तिपीठ महामार्गाची मोजणी!
Published on: 
Updated on: 

भोसे (क.) : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध होत असून आज पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करण्यास आक्रमक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत अंगावर डिझेल ओतून घेत तसेच वीज पुरवठा करणाऱ्या खांबावर चढून मोजणी बंद पाडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शक्तिपीठ महामार्गासाठी प्रशासनाकडून महामार्ग जाणाऱ्या जमिनींची मोजणी करण्यात येत आहे. आज सोमवारी पंढरपूर तालुक्यातील नांदोरे गावात मोजणीसाठी अधिकारी आले असता बाधित शेतकऱ्यांनी या मोजणीस तीव्र विरोध केला. तरीही मोजणी सुरूच राहिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह या मोजणीस तीव्र विरोध केला. काही शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर काही शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीवर चढून आंदोलन केले.

यामुळे या ठिकाणी अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सचिन लंगुटे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तहसीलदार सचिन लंगुटे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते, मात्र शेतकऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news