Solapur News | मोहोळ शिवारात उसाच्या पाचटात दिसून आली बिबट्यासदृश्य दोन पिले !

वनखात्याचे पथक पिल्यावर लक्ष ठेवून, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
मोहोळ : तालुक्यातील पाचीपट्टा परिसरात आढळलेल्या बिबट्या सदृष्य पिल्यांच्या ठशांची पाहणी करताना मोहोळच्या वनरक्षक अधिकारी श्रीम.बारसा पटेकर व कर्मचारी
मोहोळ : तालुक्यातील पाचीपट्टा परिसरात आढळलेल्या बिबट्या सदृष्य पिल्यांच्या ठशांची पाहणी करताना मोहोळच्या वनरक्षक अधिकारी श्रीम.बारसा पटेकर व कर्मचारी
Published on
Updated on

मोहोळ : मोहोळ शिवारातील 'पाचीपट्टा' भागतील उसाच्या पाचटातून बिबट्यासदृष्य दोन पिले अचानक बाहेर आल्याने परिसरात खळबळ उडाली असून सदर पिल्ले तेथून गायब झाल्याने वनखात्याचे पथक या पिल्यावर लक्ष ठेवून आहे.

मोहोळ शहर हद्दीतील पाचीपट्टा परिसरातील सचिन औदुंबर यादव यांच्या शेतातील ऊस कारखान्याला गेल्याने पेटविलेल्या या पाचटातून बिबट्या सदृष्य प्राण्याची दोन पिले बाहेर पडली.ही पिलांची वार्ता हा हा म्हणता मोहोळ परिसरात पसरली अन् या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेची दखल घेत,मोहोळ विभागाच्या वनरक्षक बारसा पटेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की ,पाचीपट्टा परिसरातील औदुंबर यादव यांच्या शेतातील ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान उसाचे पाचट पेटवून दिले होते.पाचट पेटवताच त्यामधून बिबट्यासदृष्य दोन पिले बाहेर पडली.ही घटना परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली.याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच, परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान,या घटनेची माहिती मोहोळ विभागाच्या वनरक्षक बारसा पटेकर यांना समजताच,त्यांनी वनपाल अविनाश गायकवाड,वनमजूर रावसाहेब माने,बापू वाघमोडे या वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.वनविभागाच्या पथकाने त्या परिसरात रात्रभर गस्त घातली आहे.

घटनास्थळाची पाहणी केली असता,त्या ठिकाणी बिबट्याच्या पावलांच्या खुणा आढळलेल्या नाहीत.तेथील शेतकऱ्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओ वरून ती पिल्ले बिबट्याची असावीत अशी शक्यता वाटत नाही. सदर पाचीपट्टा परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या सदृष्य प्राण्याने कोणत्याही प्राण्यावर किंवा पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. मात्र नागरिकांनी सतर्क राहावे. सदर पिल्ली कशाची होती, खात्रीशीर अजुन सांगता येत नाही. दोन-तीन दिवस रात्री गस्त घालून पहाणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच ती पिल्ले कोणत्या प्राण्याची आहेत हे स्पष्ट होईल.- श्रीम.बारसा पटेकर, वनरक्षक अधिकारी मोहोळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news