Solapur News : शासकीय रुग्णालयात डोळ्यांची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

गरीब रूग्णांना नेत्रविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे-मुंबईला जाण्याची गरज नाही
Solapur News
शासकीय रुग्णालयात डोळ्यांची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी
Published on
Updated on

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात प्रथमच डोळ्यांवरील विशेष शस्त्रक्रिया (विट्रेक्टोमी) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

डोळ्यांवरील अशा प्रकारच्या गुंतागुंतीची विशेष शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी यापूर्वी शहर-जिल्ह्यातील नेत्रविकाराने त्रस्त रुग्णांना पुणे व मुंबईला जावे लागत असे. येथील शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच डोळ्यांवरील ही विशेष शस्त्रक्रिया (विट्रेक्टोमी) येथील डॉक्टरांच्या पथकाकडून यशस्वीपणे करण्यात आल्याने शासकीय व जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या या पथकाचे कौतुक होत आहे.यापुढील काळात अशा प्रकारची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी डोळ्यांच्या विकाराने त्रस्त रुग्णांना मुंबई अथवा पुणे येथे जाण्याची गरज पडणार नाही.

शासकीय रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या दोन्ही शासकीय आरोग्य संस्थांनी संयुक्तपणे व समन्वयातून डोळ्यांच्या विशेष शस्त्रक्रियेत मोठे यश साध्य करता आले आहे. गुंतागुंतीची डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वरित्या पूर्ण करण्यात आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित असलेल्या क्लिष्ट शस्त्रक्रियेसाठी रेटिना सर्जन डॉ. आशिष चांदणे हे सेवा देतात. डॉ. चांदणे यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतागुंतीची विशेष शस्त्रक्रिया करण्यात आली. अन्य खासगी रुग्णालयांत या विट्रेक्टोमी शस्त्रक्रियेसाठी शेकडो रुपये खर्च करावे लागतात. ते गरीब रूग्णांच्या आवाक्याबाहेरचे आहे. मात्र, यापुढील काळात शासकीय रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाच्या एकत्रित प्रयत्नांतून ही विशेष आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्याची सुविधा येथील शासकीय रुग्णालयातच उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news