Solapur News| काळसर, गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

मुकुंदनगर, राजीव गांधीनगर, जम्मा वस्तीतील प्रकार; नगरसेवक जाधव यांनी वेधले लक्ष
Solapur News
सोलापूर : नगरसेवक अनंत जाधव यांनी काळसर पाण्यासह महापालिका आयुक्‍त डॉ. सचिन ओम्‍बासे यांची भेट घेतली.
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील मुकुंदनगर, राजीव गांधीनगर आणि जम्मा वस्ती परिसरात सोमवारी (दि.१५) काळसर, गढूळ पाणीपुरवठा झाला. नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. नगरसेवक अनंत जाधव यांनी संबंधित भागातील पाण्याचे नमुने बाटलीत भरून थेट महापालिकेत नेले आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागाला तत्काळ चौकशीचे आदेश देत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जाधव यांनी दिली.

दरम्यान, नगरसेवक जाधव यांनी दूषित पाणीपुरवठ्याचा व्हिडिओ विभागीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि अतिरिक्त आयुक्त यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. जर नागरिकांना अशा प्रकारचे दूषित पाणी पिण्यासाठी दिले जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनीच हे पाणी पिऊन दाखवावे किंवा नागरिकांना ते पिण्यास परवानगी द्यावी, असा संतप्त सवाल नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news