Solapur News : आयुष्यमानचे शहर जिल्ह्यात ४ लाख ९९९६ कार्डधारक

एकूण दोन हजार ३९९ आरोग्यसेवा, ९१ आरोग्य मित्र करतात विविध रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय दूर
Solapur News
आयुष्यमानचे शहर जिल्ह्यात ४ लाख ९९९६ कार्डधारक
Published on
Updated on

सोलापूर : आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून दोन ३९९ विविध आजारावर मोफत उपचार घेता येते. याचे लाभ घेणाऱ्या कार्डधारकांची शहर जिल्ह्यातील संख्या ही एकूण ४ लाख ९९९६ इतके असून शहर जिल्ह्यातील १२३ रुग्णालयात विविध आजाराने त्रस्त रुग्णांना मोफत उपचार घेता येणार आहे. या रुग्णालयात ९१ आरोग्य मित्र हे रुग्णालयात रुग्णांना येणार्या अडचणी दूर करण्यास मदत करतात. सामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी आरोग्य मित्र महत्त्वाची भूमिका बजावतात.

गेल्या काही दिवसांपासून आयुष्यमान भारत या योजनेच्या पॅनेलवर शहर व जिल्ह्यातील १२३ रुग्णालयांचा समावेश केला आहे. या १२३ रुग्णालयात विविध प्रकारचे दोन हजार ३९९ आजारावर मोफत उपचार केली जाते. येथील उपचार ही पॅनेलवरील रुग्णालयात पूर्णपणे कॅशलेस पद्धतीची करण्यात येते. या योजनेत लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत मोफत उपचाराची सोय आहे. तरीही काही रुग्णालयाकडून आयुष्यमान भारत योजनेतून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते. अशावेळी ज्या त्या रुग्णालयातील आरोग्यमित्र हे तेथे येणार्या गरीब रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करतात. अद्याप ज्या कुटुंबीयांनी व कुटुंबातील व्यक्तींनी आयुष्यमान भारत कार्ड काढलेले नाहीत. अशा प्रत्येकाने आपल्या आरोग्यावर मोफत उपचार करून घेण्यासाठी हे कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या आरोग्यावरील मोफत उपचार घेण्यात भविष्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी काळात सामान्य कुटुंबातील नागरिकांना विविध आजारावरील उपचारासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढून घेणे गरजेची असून आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध शासकीय विभागातील कर्मचारी स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news