

सोलापूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलेत शीतयुद्ध रंगले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हाके टीका करत अपशब्द बोलत आहेत. याचे पडसाद आता सोलापुरात देखील उमटले आहेत. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. 8 जून रोजी हाकेला कुत्र्यांची उपमा देत सुपारीबाज डॉबरमॅन असे नाव देण्यात आले आणि कुत्र्यांच्या गळ्यात सुपारीचे हार घालत हाकेचा निषेध करण्यात आला.
राज्यामध्ये लक्ष्मण हाके ओबीसी आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करत खोटे आरोप करत आहे. सुपारी घेऊन हा आरोप करण्याचा धंदा हाके यांचा चालू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर टिका केली तर राष्ट्रवादी त्याला चोक प्रतिउत्तर देईल.
वैचारिक लढा लढण्याचा दम असेल तर समोरासमोर चर्चा करू तुमची लबाडी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युुवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. हाकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात, साजिद पटेल, महेश कुलकर्णी, जुबेर फुलारी, दत्ता बडगंची, मौलाली भोलावले, सद्दाम गारे, आंनद सुरवसे, अक्षय सूर्यवंशी, विष्णू फुला, विनायक सूर्यवंशी, अक्षय पवार सहभागी झाले होते.