Solapur Accident: अज्ञात वाहनाच्‍या धडकेत एकाचा मृत्‍यू

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी इसमाचा मृत्‍यू झाल्याची घटना कारंबा रोडवरील आर्द्रा मॉलसमोर घडली.
 Accident
Accident
Published on
Updated on

सोलापूर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी इसमाचा मृत्‍यू झाल्याची घटना कारंबा रोडवरील आर्द्रा मॉलसमोर घडली.

३१ मे रोजी पहाटे ५० ते ५५ वर्षाचा इसम कारंबा नाका जवळील आर्द्रा मॉल समोर तुळजापूर नाक्‍याकडे पायी जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्‍यास पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्‍याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला. या घटनेची नोंद सिव्‍हिल पोलिस चौकीत झाली. अज्ञात वाहनचालकाविरोधात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news