

सोलापूर ः दक्षिण तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.24) रात्री छापा टाकला. यामध्ये 15 महिला अश्लील हावभाव करताना आढळून आल्या. त्यांच्यावर प्रेक्षकांकडून नोटा व कुपन उधळण्यात येत होते. यामध्ये पोलिसांनी 26 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारमध्ये तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने बारवर छापा टाकला. बारच्या हॉलमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते. स्टेजवर 15 महिला अश्लील हालचाली करत होत्या, त्यांच्यावर प्रेक्षकांकडून नोटा व कुपन उधळण्यात येत होते. तेथे दुर्गेश सनद, गोविंद गोस्वामी, हिरोकुमार गोस्वामी, लल्लन पंडित यांसह इतर आरोपी मिळून आले. बारचा मॅनेजर संजू ऊर्फ परसप्पा गायकवाड व आस्थापनेचे मालक रोहित चव्हाण हे असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी नोटासदृश आठ बंडल, साऊंड सिस्टीम, 10 चारचाकी वाहने, तीन मोटारसायकली, एक ऑटोरिक्षा, सात मोबाईल असा एकूण 26 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यानंतर 15 महिलांना नोटीस देऊन तपासासाठी सोडण्यात आले. ऑर्केस्ट्रा बारचालक, मालक, अश्लील नृत्य करणाऱ्या महिला, प्रेक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले, गणेश बंगाळे, गणेश पाटील, प्रशांत जाधव, श्रीदेवी प्रचंडे, विदया राऊत यांच्या पथकाने पार पाडली.
संतोष ईरप्पा हिरेमठ, (रा. विजापूर नाका सोलापूर), नितीन दिपक जाधव (रा. श्रीहरी पार्क, जुळे सोलापूर), शरण्णाप्पा नागप्पा तेली (रा. टाकळी दक्षिण सोलापूर), शिवशरण सोमनाथ दिवटे, (वय 37, रा. टाकळी ता. दक्षिण सोलापूर), संजय मनोहर झेंडेकर (रा. टाकळी ता. दक्षिण सोलापूर), बबलू महमद नदाफ (रा. टाकळी, ता. द. सोलापूर), राजेश विलास गायकवाड (रा सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर), सचिन शिवाजी जाधव (रा. भैरु वस्ती, सोलापूर), सैफ फकरोददीन जमादार (रा. कमला नगर, सोलापूर), आकाश चंद्रकांत जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर), नंदु मुनीलाल गोस्वामी (रा. महाराजा बार नांदणी), दत्ता केशव जाधव (रा. 376, रामवाडी, सोलापूर), यतिराज सुधीर सुपाते (वय 29 वर्षे, रा. देगांव, ता. उत्तर सोलापूर), आदिनाथ हणमत बाबर (रा. जि. प. शाळा देगावं, ता. उत्तर सोलापूर), आदीत्य नागेश मेणसे (रा. सलगर वस्ती सोलापूर), अक्षय सतिश शेंडे (रा. दमाणी नगर, सोलापूर), प्रशांत सुखदेव घुले (रा. लक्ष्मी चाळ सोलापूर), गौस इसुफ विजापूर (रा. सलगर वस्ती सोलापूर), संतोष राजप्पा पाटील (रा बिदर, कर्नाटक), अन्वर हुसेन आत्तार (रा. जामखाना गल्ली विजापूर), विठठल गायकवाड (रा. सोलापूर).