Solapur Garba Dandiya Events : गरबा, दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका

मुस्लिम महिलांचे पोलिसांना निवेदन
Solapur Garba Dandiya Events : गरबा, दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर शहरातील शांतता आणि धार्मिक सलोखा कायम राहण्यासाठी यंदाच्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिम धर्मीयांना प्रवेश देऊ नये, अशी अनोखी मागणी स्वतः मुस्लिम महिलांनी केली आहे. यशदा फौंडेशन व एमआयएम पक्षाच्‍या वतीने फिरदोस पटेल यांच्‍या नेतृत्वाखाली मुस्‍लिम महिलांनी पोलिस आयुक्‍तांना निवेदन दिले.

गरबा आणि दांडिया कार्यक्रमांवरून सोलापूर शहराच्या शांततेत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी मुस्लिम महिलांनी हा पुढाकार घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गरबा मंडळांनी प्रवेश देताना आधार कार्डची सक्ती करावी, जेणेकरून ओळख पटवणे सोपे होईल, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

यशदा फाऊंडेशन आणि एमआयएम पक्षाच्या वतीने फिरदोस पटेल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. ९) पोलिस आयुक्तांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. हिंदू-मुस्लिम समाजात कोणत्याही कारणाने तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मुस्लिम बांधव आणि भगिनींनी स्वतःहूनच गरबा व दांडिया उत्सवाच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही यावेळी मुस्लिम महिलांनी आपल्या समाजाला केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news