सोलापूर : शत प्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपाने सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यंदा भाजपाने दिलेला अब की बार 75 चा नारा पार करत तब्बल 87 जागा जिंकून संकल्पपूर्ती केली आहे. मागील महापालिका निवडणुकीत 49 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र भाजपाने नवा इतिहास रचला आहे.
प्रथमच भाजपाने 102 जागेवर निवडणुक लढविली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका निवडणुकीची सुत्रे हाती घेऊन आ.सचिन कल्याणशेट्टी आणि आ.देवेंद्र कोठे यांच्यामाध्यमातून अनेकांचा भाजपा प्रवेश घडवून आणला. पहिल्या टप्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानूसार शिंदे सेनेसोबत युतीतून निवडणुक लढविण्याची बैठक झाली. परंतू बैठक फिस्टली आहे. परंतू युती तुटल्यानंतर भाजपाने 102 जागेवर स्वतंत्र उमेदवार उभी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार सभा झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र0 चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. याउलट विरोधी पक्षाच्या एकाही नेत्यांनी एकही मोठ्या नेत्याने उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरकली नाहीत. विरोधी पक्षाच्या कमकुवत बाजू हेरून भाजपाने विजयाची आखणी केली. त्यात ते यशस्वी झाले.
या निवडणुकीत भाजपाने ज्या प्रभागात कधीही भाजप निवडून आला नाही अशा ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घेत आयारामांना उमेदवारी दिली. प्रथमेश कुठे यांना भाजपमध्ये घेऊन 10 आणि 11 प्रभागात भाजपने उमेदवारी दिली. त्यात संपूर्ण पॅनल निवडून आले. प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्याठिकाणी विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे यांना भाजपने पक्षात घेऊन उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक सात मध्ये माजी उप महापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली. परंतू त्यांचा पराभव झाला. ऐनवेळेस प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 22 मध्ये किसन जाधव, नागेश गायकवाड यांनाही पक्षात घेत उमेदवारी दिली , त्यात यश आले.