

सोलापूर ः सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी दि. 31 डिसेंबर 2025 रोजी होणार असून त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत मुदत राहणार आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशीच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.
दि. 19 जानेवारी 2026 पर्यंत निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.प्रभाग 4 व 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पॅनलप्रभाग चार व पाच मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पॅनल मधील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या समवेत हे पॅनल दाखल झाले. प्रभाग पाच मधून आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे यांनी तर प्रभाग चार मधून कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे, विश्वनाथ बिडवे, सुशील बंदपट्टे या उमेदवारांनी अर्ज भरले.शिवसेना उबाठा पक्षाचे नेते एबी फार्मसह तळ ठोकूनशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 30 एबी फॉर्म घेऊन उपनेत्या अस्मिता गायकवाड व जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी हे नार्थकोट प्रशालेत ठाण मांडून होते. प्रत्येक उमेदवाराला प्रत्यक्ष एबी फॉर्म देत त्यांनी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण केली.पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, कमांडो यांनी केली गर्दी नियंत्रित दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच निवडणूक कार्यालय आवारामध्ये इच्छुक उमेदवारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उमेदवारांसह सुचक व अनुमोदक वगळता अन्य झालेली गर्दी काढण्यासाठी कमांडो आणि पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गर्दी नियंत्रित केली. तसेच सर्व इच्छुक उमेदवारांना रांगेत थांबण्याची सूचना दिल्या.