

सोलापूर : सोलापूर महापालिका प्रारूप मतदार यादीवर आज शेवटच्या दिवशी बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी दिवसभरात एकूण 114 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 दरम्यान मुदती अखेर एकूण 555 हरकती व सूचना महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.
बुधवारी दिवसभरात मतदार यादीमध्ये काही लेखनिकाच्या चुका असल्यास त्याबाबतचे प्राप्त अर्ज - 4, दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावे त्या प्रभागतून वगळण्यात यावी व संबंधित प्रभागत समाविष्ट करण्याबाबतचे प्राप्त अर्ज - 98 , मनपा संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा भाग यादीत मतदारांची नावे असूनही मनपाच्या मतदार यादी मध्ये त्यांची नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत प्राप्त अर्ज - 3, इतर अर्ज - 9 असे अशा एकूण 114 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.दि. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 दरम्यान एकूण 555 हरकती व सूचना महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.